शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (08:11 IST)

मंगळवेढ्यात पाच दूध डेअरींवर अन्न व भेसळ पथकाच्या धाडी

मंगळवेढा : अन्न व भेसळ विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने आले. विविध ठिकाणी धाडी टाकून दुधाचे नमुने घेतल्याने दूध डेअरी चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
 
राज्यात मोठया प्रमाणात दुधात भेसळ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना स्वच्छ व गुणवत्तापूर्वक दुधाचा पुरवठा होण्यासाठी या कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. शहरात श्रीराम मिल्क कलेक्शन सेंटर होनमाने गल्ली, मायाक्का मिल्क प्रॉडक्ट सांगोला नाका, विजया महिला दूध संघ गुंजेगाव, हिरीजेट फुडस् आंधळगाव, हटसन दूध डेअरी संकलन केंद्र बोराळे आदी ठिकाणी छापे टाकण्यात येऊन येथील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
 
या कारवाईत जिल्हा दूध विकास अधिकारी डॉ. निलाक्षणी जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, केमिस्ट अधिकारी सुरेश सरडे, अधिकारी सुरेश सरडे, सहायक अमोल गुंडेस्वार व इतर अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, म्हशीच्या दुधाला फॅटप्रमाणे ६० रुपये प्रतिलिटर तर जर्सी गाईच्या दुधाला ३४ रुपये प्रति लिटर असा दर मिळत आहे. दूध डेअरी चालक जादा पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी कमी दराचे जर्सी गाईचे दूध म्हशीच्या दुधात मिसळून ग्राहकांना म्हशीच्या दुधात गाईच्या दुधाची भेसळ करून ती ग्राहकांना प्रतिलिटर ७० रुपये दराने विक्री करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.