नाशिक :कत्तलीसाठी घेऊन जाणारे १२० गोवंश ताब्यात
नाशिक येथील एका कत्तलखान्यात छापा टाकत १२० गोवंश जातीची जनावरे जप्त करण्यात पिंपळगाव व ओझर पोलिसांना यश आले.
मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने ही कारवाई केली. दरम्यान, एक दिवसाच्या अंतराने झालेल्या कारवाईमुळे गोवंश वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ओझर येथे कत्तलीच्या उद्देशाने १२० गोवंश अतिशय निर्दयीपणे बांधून ठेवलेले आढळून आल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला. तर ४०० किलो गोमांस आढळून आले.
गोवंश पिंपळगावच्या गोशाळेत पाठविण्यात आले आहे. रात्री उशिरा दोषींवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चांदणी चौकातील केजीएन कॉलनी परिसरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लगभग प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, निफाड, लासलगाव, ओझर, पिंपळगाव बसवंत, ताहाराबाद, जायखेडा येथील कार्यकर्त्यांनी खलील कुरेशी व अकबर कुरेशी यांच्या स्लॉटर व गोडाऊन याठिकाणी ज्येष्ठ गोरक्षक समाधान कापसे, पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मदतीने छापा टाकून ११६ गोवंश वाचवण्यात यश आले. कारवाईआधी काही गोमांस मुबंईकडे गेल्याचे आढळून आले. दोन संशयितांसह हत्यार जप्त करण्यात आले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor