गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (08:35 IST)

पिंपळगावच्या युवकाची मालेगाव पोलीस ठाण्याशेजारी आत्महत्या

suicide
पिंपळगांव बसवंत :  तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील युवकाने मालेगाव शहर पोलीस ठाण्याशेजारीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
 
मालेगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत येथील राजू नबाब शहा (वय २७) हा युवक दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथे गेला होता. त्याने मालेगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशेजारील दत्त मंदिरालगतच्या कंपाऊंड गेटच्या भिंतीच्या अँगलला पिवळी पट्टी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे यांनी युवकास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले.
 
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबीर सिंह संधु यांनी मालेगावचे प्रथमवर्ग दंडाधिकारी व तहसिलदारांना पत्रव्यवहार केला.
 
मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबीर सिंह संधु, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. सावंजी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेचा तपास करीत आहे.
 
दरम्यान, पोलीस ठाण्याच्या शेजारीच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor