गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जानेवारी 2026 (09:15 IST)

मतदानापूर्वी नागपुरात गोंधळ, पालकमंत्री बावनकुळे यांच्या गाडीला घेरले; पोलिस तैनात

bawankule
मतदानापूर्वी नागपुरात गोंधळ उडाला. पालकमंत्री बावनकुळे यांच्या गाडीला घेरले, काँग्रेसने पैसे वाटल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाच्या पथकाने चौकशी केली.  
 
मिळालेल्या माहितीनुसार मतदानाच्या आदल्या दिवशी नागपुरात राजकीय वातावरण तापले. पश्चिम नागपूरच्या कुतुबशाह नगर भागात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका कार्यकर्त्याच्या घरी भेटीवरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये  आरडाओरडा झाला.
 
दुपारी १२ वाजताच्या सुमारास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गिट्टीखान परिसरातील कुतुबशाह नगर (विभाग क्रमांक १०) येथील त्यांचे जुने कार्यकर्ते राजू देवगडे यांच्या घरी पोहोचले. मंत्री येताच काँग्रेसचे उमेदवार प्रमोद ठाकूर आणि त्यांचे समर्थक पोहोचले. कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्या गाडीला घेरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केला की पैसे वाटले जात आहे. लगेचच मोठी गर्दी जमली. काँग्रेस नेते अरुण डावरे रस्त्यावर झोपले आणि त्यांनी मंत्र्यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. 
वादा नंतर, निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घराची कसून झडती घेतली आणि तपास केला. प्रशासकीय सूत्रांनुसार, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा रोख रक्कम सापडली नाही.
बावनकुळे यांचे मत: मी फक्त माझ्या कार्यकर्त्याच्या भावाची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. एखाद्याच्या घरी जाणे गैर नाही. मी विकास ठाकरे यांना परिस्थिती स्पष्ट केली आहे असे देखील ते म्हणाले. 
Edited By- Dhanashri Naik