शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (13:08 IST)

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मातृशोक

Gulabrao Patil
राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक झाला. त्यांची आई रेवाबाई रघुनाथराव पाटील यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. 
 
 रेवाबाई रघुनाथराव पाटील या ७५ वर्षांच्या होत्या. आज पहाटे पाळधी इथल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रेवाबाई पाटील यांच्या पार्थिवावर पाळधी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमारास राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.