1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , शनिवार, 24 मार्च 2018 (11:07 IST)

मोदींकडून देशवासियांचा भ्रमनिरास

hardik patel
विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी कुशल वैमानिकाची आवश्यकता असते. तद्वतच देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी देशाला चांगल्या पंतप्रधानांची गरज आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नागपुरात केली. मोदींकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असून अच्छे दिनची आशा मावळल्याचे ते म्हणाले.
 
अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकर्‍यांना दादुप्पट भाव देऊ, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकरी आत्हत्यांध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.