1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 मार्च 2018 (08:48 IST)

पावसाळी अधिवेशन होणार नागपूर येथे

nagpur vidhansabha
महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाणार आहे. हे घेण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. यासाठी तीन जणांची उपसमिती नेमली असून त्या द्वारे सर्व  
निर्णय घेतले  जाणार आहे. या करीता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या नवीन समितीमधील सदस्य  
विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत असे सरकारने स्पष्ट केल आहे.

सरकार 4 जुलैपासून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत पूर्ण विचार करत आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जास्त दिवस मिळत नाहीत. त्यामुळे अनेक निर्णय लांबणीवर राहतात सोबतच कामाला गती देण्यात यावी या करिता  हे अधिवेशन गरजेचं असल्यानं नागपुरातच पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे सरकारला कामासाठी अधिक वेळ मिळणार आहे.