सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (16:27 IST)

Harishchandragad : हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी गेलेले 6 तरुण भरकटले, एकाचा मृत्यू

अहमदनगरच्या हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगला जण काही तरुणांना जीवावर बेतलं. या तरुणांपैकी एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सहा तरुण पुण्यावरून हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंग साठी आले होते. 1 ऑगस्ट रोजी या सहा तरुणांनी सायंकाळी तोलार खिंडीतून चढण करण्यास सुरु केले. गडावर चढताना ते जंगलात वाट चुकले आणि पाऊस सुरु झाला. त्यांनी डोंगराच्या कपारीचा आडोसा घेत रात्रभर तिथे मुक्काम केला. पावसाने आणि थंडीने गारठून त्यापैकी एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. अनिल गीते असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
पुण्यातून कोहगाव येथे राहणारे अनिल उर्फ बाळू नाथराव गीते, गोविंद दत्तात्रय आंबेकर, अनिल मोहन आंबेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे, महादू जगन भुतेकर आई आसाराम  तिपाले असे हे सहा तरुण हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी निघाले. आणि जंगलात भरकटले आणि त्यापैकी एकाचा थंडीनं गारठून मृत्यू झाला. 
 
या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यावर त्यांनी स्थानिकांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं रेस्क्यू करून मयत अनिलच्या मृतदेहासह त्यांना गडावरून खाली आणले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या तरुणांवर उपचार सुरु असून त्यापैकी तिघांची प्रकृती खालावली आहे. तर दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मयत अनिल गीते याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. 
या घटनेमुळे कोहगाव येथे खळबळ उडाली आहे. 

Edited by - Priya Dixit