मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (14:58 IST)

शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली

vinayak raut facebook
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर, ते निशण्यावर आहेत. आता शिवसेना नेते विनायक राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
 
माध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत यांनी कदमांवर जोरदार हल्लाबोल केला. 'शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली. रामदास कदम जी काही बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही,' अशी टीका राऊत यांनी केली. तसेच, त्यांनी यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचाही एक किस्सा सांगितला.
 
'नारायण राणे शिवसेना सोडून जात होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते. नारायण राणे यांच्यासोबत राणे गटात या, असे शिवसैनिकांना सांगण्यात कदम आघाडीवर होते,' असा आरोपही विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor