मंगळवार, 8 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:15 IST)

शिवसेना का फुटली? याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल

ramdas kadam
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना का फुटली? का दोन भाग झाले? का दोन मेळावे घ्यावे लागलं? याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल, असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
रामदास कदम म्हणाले, “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक स्वत: येतील. त्यामुळे शिवसेना कोणाची याचा निर्णय न्यायालयाच्या आधी पाच तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्याला लागेल. शिवसेनेची ताकद असती, तर ५० आमदार आणि १२ खासदार आपल्याला सोडून गेले नसते. एक झेंडा, एक मैदान, एक विचार, एक नेता हे शिवसेना प्रमुखांच्या वेळी होते. राष्ट्रवादीतून भाड्याने आणलेल्या लोकांना नेते, उपनेते बनवून आमच्या अंगावर सोडलं जात आहे. त्याची सर्व उत्तर उद्याच्या मेळाव्यात मिळतील,” असा निशाणा रामदास कदम यांनी साधला आहे.
आणखी वाचा
 
रामदास कदम यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं होते. त्याला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे. त्यांचा मेंदू सडलेला आहे. नासक्या डोक्यातून नासके विचार येतात. भास्कर जाधवांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत प्रवेश केला.