रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (11:51 IST)

हृदयद्रावक ! पित्याने आपल्या पोटच्या मुलाला नदीत फेकून जीव घेतला

इचलकरंजीच्या कबनूर येथे एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या मुलाला पंचगंगे नदीत फेकून त्याचा जीव घेण्याची दुर्देवी घटना घडली आहे.अफान सिंकन्दर मुल्ला (5)असे या चिमुकल्या मुलाचे नाव आहे.या प्रकरणाची कबुली मुलाच्या पित्यानेच दिली आहे.त्यामुळे नराधमी पित्याला सिकंदर हुसेन मुल्ला (48) अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर मुल्ला हा अपंग असून मोलमजुरीचे काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे निरसन करतो.त्याला दोन अपत्ये आहे.एक मुलगी दहा वर्षाची आणि मयत मुलगा पाच वर्षाचा.सिकंदरला दारू चे व्यसन आहे. अफान याला फिट्स येण्याचा आजार होता.त्यामुळे त्याच्यावर औषधोपचारासाठी बराच खर्च व्हायचा.

या कारणास्तव त्याच्या घरात नेहमीच वाद होत असे. काही दिवसांपूर्वी वादाने कंटाळून सिकंदर घरातून निघून गेला.त्याला त्याच्या पत्नी आणि मेहुण्याने शोधून घरी आणले. मुलाच्या औषधोपचारासाठी त्याच्या घरात पुन्हा वाद झाले.औषधोपचाराला बरेच पैसे लागतात आणि मुलाचा आजाराला कंटाळून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.आपण तुझे औषध घेऊन येऊ असे सांगत तो चिमुकल्या अफान ला आपल्याबरोबर घेऊन गेला आणि त्याने निर्घृण पणे चिमुकल्या अफान ला पंचगंगा नदीपात्रात फेकून दिले.
 
रात्री घरी तो एकटा परतल्यावर त्याच्या पत्नीने अफान कुठे आहे विचारपूस  केल्यावर मी त्याला पंचगंगा नदी पात्रात पुलावरून फेकून दिले असे सांगितल्यावर त्याच्या पत्नीने हंबरडा फोडला.त्याच्या पत्नीला आधी त्याच्यावर विश्वास बसला नाही. परंतु नंतर अफानचा काहीच शोध लागला नाही तेव्हा त्याला नातेवाईकांनी पोलिसांच्या ताब्यात देईल आणि त्याने घटनेची कबुली केली. पोलीस अद्याप अफानच्या मृतदेहाचा शोध पंचगंगा नदीत घेत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.