महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा कहर  
					
										
                                       
                  
                  				  Weather News : देशात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. रविवारी पाच राज्यांमधील २१ शहरांमध्ये ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट कायम राहील.
				  													
						
																							
									  तसेच देशात उष्णता वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशातील अनेक शहरांनाही तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ झाल्यामुळे, प्रत्येक शहरातील तापमानात तीन अंश ते ६.९ अंशांचा मोठा फरक दिसून आला. हवामान खात्याने म्हटले आहे की, वाऱ्याचा वेग कमी असल्याने उष्णता वाढली. हवामान खात्याने सांगितले की, वाऱ्याचा वेग कमी असल्याने तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.   तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि अगदी ओडिशामध्येही उष्णतेची लाट कायम राहील. 
				  				  Edited By- Dhanashri Naik