Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज

Updated: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (08:58 IST)
 
पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवडय़ात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही.
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाला पोषक स्थिती असून, येत्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (१९ सप्टेंबर) कोकण, मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
 
१८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या आठवडय़ात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाची हजेरी लागू शकते. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल. त्यानंतरच्या आठवडय़ात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याजवळच्या जिल्ह्यंमध्ये पाऊस असेल. इतरत्र पाऊस कमी होईल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पॅरा हॉकी विश्वचषक पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषकांसोबत खेळला जाईल

एनएच-४८ वरील बेकायदेशीर हॉटेल्स आणि खानावळींवर कारवाई, वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी मोठी तयारी; सरकारचा खास प्लॅन

पुढील लेख
Show comments