गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (10:22 IST)

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर

राज्यात मंगळवारी दिवसभरात २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर पोहोचली आहे. दरम्यान राज्यात ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत रुग्णांची संख्या ३० हजार ४०९ इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.७७ टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात १९ हजार ४२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यत ७ लाख ७५ हजार २७३ करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७०.६२ टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यत ५४ लाख ९ हजार ६० चाचण्या करण्यात आल्या असून यामधील १० लाख ९७ हजार ८५६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ३४ हजार १६४ जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार २२५ जण संस्थात्मक क्वारंटइन आहेत.