शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (15:37 IST)

कोकण-गोवा, विदर्भात पावसाचा जोर

monsoon
पुणे पुढील तीन दिवस कोकण-गोवा तसेच विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ातील काही भागातील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे.
 
मध्य प्रदेश व लगतच्या भागात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाला आहे. याच्या प्रभावामुळेच गेले दोन दिवस राज्यात पावसाचा जोर होता. गेल्या 24 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात मुसळधार पाऊस झाला. विदर्भातील ऑरेंज अलर्टचा इशारा हटला आहे, पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोकण गोव्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.