Maharashtra rain : पुणे, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
राज्याच्या विविध भागात चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पुढील तीन दिवस शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार, गुरुवार, 14 जुलै 2022 ते रविवार, 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पर्यटक, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या पर्यटनस्थळांवर कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
कोणकोणत्या ठिकाणी आदेश लागू?
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार खालील पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू असेल
जमावबंदी
या ठिकाणी वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेत व अपघाताचा संभाव्य धोका टाळण्यासाठी फौजदारी दंड संहितेचे कलम 144 लागू करण्यासंदर्भात वन विभागानेही शिफारस केली आहे.