संबंधित माहिती
- राज्यातील पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचं संपूर्ण लक्ष
- शीतल म्हात्रे यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा न मिळालेलं 'ते' वादग्रस्त प्रकरण कोणतं?
- उद्धव गटाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून नवीन मंत्र्यांना शपथ न देण्याची विनंती केली
- शीतल म्हात्रे कोण आहेत, ज्या उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात गेल्या?
- राज्यभरात ठिकठिकाणी पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांनी केली गडचिरोलीत हवाई पाहणी
आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश
पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्या आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिलेत. pic.twitter.com/vWTFAWHVDJ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 13, 2022
राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
