शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 सप्टेंबर 2025 (21:09 IST)

नाशिकमध्ये सुरक्षा रक्षकाला मारहाण, ५ आरोपींना अटक

crime
नाशिकमधील शरणपूर रोडवर संशयितांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि ५ आरोपींना अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नलजवळील एका व्यावसायिक संकुलात कर्तव्यावर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात असे स्पष्ट झाले की अंगावर गंभीर दुखापतींमुळे सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. या खुलाशानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि पाचही आरोपींना अटक केली आहे. मृत सुरक्षा रक्षकाचे नाव राजू वाघमारे असे आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी राजू वाघमारे हा ड्युटीवर होता. त्याचवेळी कस्तुरबा नगरमध्ये राहणारा त्याच्या ओळखीचे पाच तरुण तिथे पोहचले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादामुळे ते संतप्त झाले होते. या वैमनस्यातून त्यांनी राजूवर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली. गंभीर दुखापतींमुळे राजूचा जागीच मृत्यू झाला.
Edited By- Dhanashri Naik