चंद्रपूरमध्ये वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू तर पावसामुळे विठ्ठल मंदिराचे नुकसान!
चंद्रपूरमध्ये वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सिंदेवाहीमधील एका मंदिराचे नुकसान झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना, रस्ते अपघात आणि मुसळधार पावसामुळे लोकांची चिंता वाढली आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पुण्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी; सिंहगड किल्ला १ आणि २ ऑगस्ट रोजी पर्यटकांसाठी बंद
चिमूर तालुक्यात वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर सिंदेवाही तालुक्याच्या मोहाली गावातील विठ्ठल मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिराचे नुकसान झाले आणि एक महिला जखमी झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.Edited By- Dhanashri Naik
