मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2017 (07:38 IST)

नागरिकांच्या विरोधानंतर कोल्हापुरात अखेर हेल्मेट सक्ती मागे

helmet

जनतेच्या मोठ्या विरोधानंतर कोल्हापूर आणि इतर  पाच शहरात सुरु केलेली  हेल्मेटसक्ती पूर्णतः  थांबवण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची  बैठक झाली. त्यात सर्व बाबी ऐकून घेवून हा निर्णय घेतला गेला आहे. 

कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये15 जुलैपासून   हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याला राजकीय वळण दिले गेले आणि नागरिकांनी सुद्धा मोठा विरोध दर्शवला होता. त्यामुळे सर्व पक्षीय सदस्यांनी पोलिस महानिरीक्षकांची भेट घेतली. जनजागृती करत आपण लोकांना हेल्मेट वापरायला सांगितले पाहीजे असे बैठकीत ठरले आहे.या बैठकीला शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.