गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (09:14 IST)

हिरामण खोसकर अजून काँग्रेसमध्येच

congress
काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  त्यांच्यासमवेत ११ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातील इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी अद्याप राजीनामा दिला नाही. ते सध्या केनियाच्या दौऱ्यावर आहेत.
 
या अकरा आमदारांमध्ये नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे हिरामण खोसकर यांचेदेखील नाव घेतले जात आहे. हिरामण खोसकर हे जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्यातील २२ आदिवासी आमदार सध्या केनियाच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा १४  फेब्रुवारीला संपणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला आमदार खोसकर भारतात परततील. त्यावेळी ते याबाबत स्पष्टीकरण देतील असे वामन खोसकर म्हणाले.
 
दरम्यान, खोसकर यांच्या कार्यालयातर्फे या संदर्भात एक पत्रकदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये खोसकर यांचा भाजप प्रवेश आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा या दोन्ही गोष्टी सत्य नाहीत.खोसकर सध्या केनियाला असल्यामुळे त्यात काहीही तथ्य नाही, असा दावा करण्यात आला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor