सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (08:43 IST)

नवनीत राणां विरोधात कॉंग्रेस आक्रमक, निवडणूक आयोगाकडे ही मागणी

Navneet Rana
खासदार नवनीत राणा आणि कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यामधील वादाने अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यावर आता कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत काँग्रेस कडून खासदार नवनीत राणा याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, नवनीत राणा यांनी कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असे त्या म्हणाल्या होत्या। यावर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात 100 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता.
 
त्यानंतर आता अमरावती जिल्हाधिकारी मार्फत काँग्रेसच्या अनुसूचित जातीच्या जिल्हाध्यक्ष कडून राणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नवनीत राणा यांच्या या आरोपाची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी, यशोमती ठाकुर यांना नवनीत राणा यांनी जे पैसे दिले, त्याचा हिशोब निवडणूक आयोगाकडे दिला का?त्याची सखोल चौकशी करावी ,नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी काँग्रेस कडून यावेळी करण्यात आली आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor