जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात गुरुवारी ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, अशी वेदनादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ जामनेर-बोडवाड रस्त्यावर झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे एक पथक पाठवण्यात आले.
माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जामनेर-बोदवड रस्त्यावरील मालदाभाडी शिवारातील मुख्य रस्त्यावर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब एकाच दुचाकीवरून जात होते. यादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ लहान मुलांचा ज्यात एका ३ महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आणि २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.पुढील पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

