गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (20:26 IST)

मोबाईलचा मोठा स्फोट, एक जण गंभीर जखमी

mobile sfot
नाशिक शहरातील उत्तम नगर भागामध्ये मोबाईलचा मोठा स्फोट झाला आहे. मोबाईलच्या स्फोटामुळे घरातील काचा फुटल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या मोबाईल स्फोटामुळे घरातील तीन जण जखमी झाले आहेत. यातील एक जण गंभीर जखमी झाला असून जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा मोबाईलचा स्फोट एवढा भीषण होता की, आजूबाजूचा घरांच्या देखील फुटल्या काचा फुटल्या आहेत.
 
तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हा मोबाईलचाच स्फोट होता का? या बाबत अधिक तपास सुरु आहे. 
 
हा स्फोट अत्यंत तीव्र स्वरुपाचा होता. यात घरातील बरेच साहित्य जळून खाक झाले आहे. या स्फोटामुळे घराबाहेरील गाड्यांचा काचा फुटल्या तसेच आजूबाजूच्या घरांच्याही काचाही फुटल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मोबाइल चार्जिंगला लावलेला तिथे एक परफ्युम होता या स्पोटामुळे यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या देखील काचा फुटल्या, तसेच आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या.