रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2017 (12:59 IST)

राणीच्या बागेतील पेंग्विन पाहता येणार

मुंबईकरांना शुक्रवारपासून राणीच्या बागेत पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पर्यटकांना पेंग्विन्स पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विनना राणीच्या बागेत आणण्यात आले.
तेव्हापासून पेंग्विन केव्हा पाहायला मिळणार, याची उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिली होती. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडत गेले.
 पेंग्विनना पाहण्यासाठी पर्यटकांना किती रूपये शुल्क द्यावे लागणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.