‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले
‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून दुपारी त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. दरम्यान, हे ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकत आहे. सुरवातीला हे वादळ हरिहरेश्वर जवळ धडकण्याची शक्यता होती. मात्र, संध्याकाळपर्यंत यात बदल होऊन ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.