1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (23:35 IST)

चक्रीवादळाचा धोका; बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र

मुंबई: महाराष्ट्र मध्ये गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. भारताच्या हवामान खात्याने IMD सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा हा येत्या 12 तासांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा Hurricane धोका निर्माण झाला आहे. यामुळे आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलं आहे.
 
भारतीय हवामान शास्त्र खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी चक्रीवादळाविषयी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होऊ शकत. याच्या परिणामी येत्या 12 तास मध्ये चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.