रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (15:49 IST)

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

murder
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पतीला अतिशय बेदम मारहाण केली. या निघृण कृत्यात पत्नीच्या डोके, चेहरा, हनुवटी अतिशय गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पतीनेच पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून पत्नीला मृत घोषित केले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव आरती विशाल कापसे (वय २४, रा. माळवाडा, माडसांगवी) असे आहे. सोमवारी (१६ मे) रात्री ११ वाजेच्या सुमारास आरती आणि तिचा पती विशाल यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यात विशाल अतिशय संतापला. त्यामुळे त्याने पत्नी आरतीला अतिशय बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी जबर होती की आरतीच्या डोके, चेहरा, हनुवटीला गंभीर दुखापत झाली. आरती बेशुद्ध झाल्याचे विशालच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने तिला त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला पासून मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याला अटक केली जाणार आहे.