रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (13:10 IST)

बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली

suicide
नवरा बायकोत वाद होतातच.वाद विकोपाला गेल्यावर घटस्फोट देखील होतात. वाद विकोपाला जाऊन आत्महत्या केल्याच्या घटनाही घडतात. पण औरंगाबाद मध्ये पाच महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका पतीने पत्नीला साडी नेसता येत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी येथील राजनगर येथे घडली आहे. 

अजय समाधान साबळे असे या मयत तरुणाचे नावे आहे. अजयने व्हॉट्सअॅपवर स्टेट्स मध्ये 'आय क्विट’ असे लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच पत्नीला साडी नेसता येत नसल्याचे देखील त्याने सुसाइड नोट मध्ये लिहिले आहे. 
 
अजय हा मुकुंदवाडीतील राजनगर येथे आपल्या आईवडिलांसह राहत असून प्लम्बरचे काम करायचा. पाच महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्याने  रविवारी आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेट्स मध्ये 'आय क्विट’ असे लिहून पोस्ट केले.

त्याने असे का लिहिले म्हणून त्याचा एक मित्र त्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्याच्या खोलीत गेल्यावर अजय त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलिसांना त्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून त्याला बायको योग्य मिळाली नाही. तिला स्वयंपाक करता येत नाही. साडी नेसता येत नाही. या सुसाईड नोट मध्ये अजय ने केलेली सही पडताळणीसाठी पाठविण्यात येण्याचे पोलिसानी सांगितले. पोलिसांनी आत्महत्येचे प्रकरण नोंदले असून पुढील तपास करत आहे.