बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (08:56 IST)

शिल्लक राहणारी मते आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ - शरद पवार

sharad panwar
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या संघटनेची घोषणा केल्यानंतर राज्यसभेच्या जागेसाठी अपक्ष म्हणून उभं राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

राज्यसभेतील सहा जागांसठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्यात भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याचं संख्याबळ पक्षांकडे आहे.
 
संभाजीराजे यांना अर्ज दाखल करण्यासाठी 10 अनुमोदन आमदारांची आणि निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
 
नांदेड येथे पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "राज्यसभेचा निकाल प्रत्येक पक्षाची किती ताकद आहे यावर अवलंबून आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य निवडून यायला कोणतीही अडचण नाही. त्याची मतांची गरज भागून राष्ट्रवादीकडे 10.12 मतं जादा शिल्लक राहतात. शिवसेना आणि काँग्रेसचीही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे उर्वरित मतं आम्ही सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना देऊ."
 
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मतं शिल्लक राहतात. तसंच पाठिंबा दिलेल्या आमदारांचे संख्याबळ मिळून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मतं शिल्लक राहतात.