रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (08:10 IST)

येवला तालुक्यातील कातरणी येथे बापानेच केला मुलाचा खून

murder
येवला तालुक्यातील कातरणी येथे वडीलांनीच आपल्या मुलाचा खून केल्याची घटना घडली. या घटनेत पोलिसांनी वडील बाळासाहेब अण्णासाहेब आगवणे (वय ५०) यांना अटक केली आहे. कौटुंबिक कारणातून वडील व मुलांमध्ये झालेल्या भांडणात ही घटना कातरणी ते समीट रेल्वे स्थानकाकडे जाणा-या रोडवर घडली. या भांडणात वडीलांनी मुलास डोक्यावरुन उचलून आपटल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तश्राव होऊन तो मरण पावला. या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव संदीप बाळासाहेब आगवणे (वय ३२) असे आहे. संदीप हा रात्री दारु पिऊन आला त्याने वडील बाळासाहेब अण्णासाहेब आगवणे (वय ५०) यांच्याशी भांडण सुरु केले. त्यात त्यांनी तुम्ही माझे चांगल्या मुलीशी लग्न लाऊन दिले नाही. त्यामुळे ती घर सोडून गेली असे सांगितले. यातून भांडण सुरु झाले. त्यातून ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी भांदवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहे.