मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , सोमवार, 16 मे 2022 (21:40 IST)

कोट्यावधीचं वीजबिल थकल्याने कबनूरचा पाणीपुरवठा बंद

water tank
कबनुरकबनूर ग्रामपंचायत च्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण कबनूर गावाला बसला आहे. जलस्वराज योजनेवरील कोट्यावधीचे वीजबिल ग्रामपंचायती कडून थकित राहील्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला असून आजचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे कबनूर गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  
 
योजनेवरील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायच्या वतीने या दोन दिवसांमध्ये साडेबारा लाख रुपये भरण्यात आलेला आहे. आणखी साडेसात लाख रुपये भरल्यानंतरच योजनेवरील विद्युत पुरवठा सुरू होईल, असे विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी दिली. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारी कदाचित ग्रामपंचायतीकडे रक्कम भरल्यानंतरच नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.