गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 जुलै 2021 (15:51 IST)

चारित्र्य संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

एका 24 वर्षीय महिलेचा तिच्या पतीने चारित्र्य संशयावरून गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.ही घटना भंडारा येथील आहे.एका खाजगी दवाखान्यात ही महिला काम करत होती.मात्र तिचा पती नेहमी तिच्यावर विवाह बाह्य संबंध असण्याचा संशय घेत होता कोरोनाच्या कालावधीत तिला या दवाखान्यातून नोकरी सोडावी लागली.नंतर ती घरातच राहायची.
 
स्नेहलता लंकेश्वर खांडेकर असे या मयत महिलेचे नावं असून ती भंडारा जिल्ह्यातील राजेहदेगाव सुयोग नगर येथील राहणारी होती.तिचा पती कंत्राटी कामगार असून ती स्वतः एका खाजगी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून कामाला होती.या जोडप्याचे लग्न 5 वर्षा पूर्वी झालेले असून त्यांना एक 4 वर्षाची मुलगी आहे.
 
बऱ्याच दिवसापासून मयत महिलेचा पती आरोपी लंकेश्वर खेमराज खांडेकर हा आपल्या पत्नीवर तिचे विवाह बाह्य संबंध आहे आणि तिचा प्रियकर तिला भेटण्यास येतो असा संशय घेत होता.या संशयामुळे त्याने विकोपाला जाऊन पत्नीचा गळा आवळून खून केला.या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे.