बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:22 IST)

पती ठरत होता प्रेमप्रकरणात अडथळा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केला पतीचा खून

murder
नाशिकच्या पेठ घाटात कारमध्ये मृत अवस्थेत मिळून आलेल्या अनोळखी तरूणाच्या खूनाचा उलगडा करण्यात  ग्रामीण पोलीसांना यश आले आहे.
प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने एक लाखाची सुपारी देऊन खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
 
पेठ येथील कोटंबी घाटात डस्टर कार एम एच ४३ एडब्ल्यू १३०८ मधे अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी खूनाचा प्रकार असल्याने याप्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी अज्ञात मारेक-याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुठलाही धागेदोरे नसताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ आणि स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना सदर म्रुतदेह निफाड येथील सचिन श्यामराव दुसाने (३० रा. गणेशनगर, निफाड) याचा असल्याचे समोर आले.
 
पोलिसानी सुतावरून स्वर्ग गाठत मृताच्या पत्नीसह उर्वरीत संशयिताना अटक केली. त्यानंतर खूनाचा उलगडा झाला. या प्रकरणात खुनाच्या सुपारीची एक लाखांची रक्कम व मोबाईल, कार असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 
या खून प्रकरणात दत्तात्रय शंकर महाजन (४३, बांधकाम व्यवसाय, रा. गणेशनगर, निफाड), संदीप किटटू स्वामी (३८, इडली डोसा विक्रेता, सिडको), अशोक मोहन काळे (३० मजुरी रा. कारगिल चौक, दत्त नगर, चुंचाळे), गोरख नामदेव जगताप (४८, धंदा रिक्षाचालक, रा. दुर्गादेवी मंदिराजवळ, राणा प्रताप चौक, सिडको), पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड), मुकरम जहिर अहेमद शहा (२६ रा. विराट नगर, अंबड आयटीआय लिंक रोड) व शोभा सचिन दुसाने (मृताची पत्नी, वय ३० रा. गणेशनगर, निफाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.