शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (07:41 IST)

माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय

sushma andhare
सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्ष धमकी येत असल्याची धक्कादायक माहिती पत्रकारपरिषदेत दिली. या बाबत उद्धव ठाकरे यांना कळवले असून सुरक्षा पुरावण्याबाबत पक्षाने पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत आणि राजन विचारे यांची देखील उपस्थिती होती.
 
नुकताच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांचे भाषण गाजल्याने राजकीय पटलावर त्या झळकल्या. आज(गुरुवार) वाशीत महाप्रबोधन मेळाव्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी धमकीबाबत माहिती दिली.
सुषमा अंधारे म्हणाल्या “माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय. काही इनपूट्स आले आहेत. ज्यामध्ये असं समजलं की, बाहेर पडू नका. कोणी हल्ला करेन, धक्काबुक्की करेन. काल विद्यापिठात एलआयबीचे लोक माझ्याजवळ आले, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, लोहगाव पोलीस स्टेशनचे फोन येत होते आणि विचारलं जात होतं की तुम्ही सुरक्षित आहात का? मला समजलं नाही की असं का सुरू आहे. मग लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे, काहीतरी सुरू आहे.”

Edited by : Ratnadeep Ranshoor