1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (11:07 IST)

'शिवसेनेकडून असं होईल हे कधी वाटलं नव्हतं' - नीलम राणे

'I never thought this would happen from Shiv Sena' - Neelam Rane Maharashtra News Regional Marathi  News In Marathi Webdunia Marathi
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात सुरू आहे.यादरम्यान त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी पहिल्यांदाच शिवसेनेवर निशाणा साधला.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर नारायण राणे यांची अटक आणि जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेकडून असं कधी होईल असं वाटलं नव्हतं असं त्या म्हणाल्या
 
नीलम राणे म्हणाल्या, "या थरापर्यंत जातील असं वाटलं नव्हतं.जुहू येथील घरावर हल्ला केला याचं मला अधिक दु:ख वाटलं. माझी नातवंड आणि सुना घरात होत्या त्यामुळे मला वाईट वाटलं.घरापर्यंत माणसं येतात तेव्हा त्यांना बेस राहिला नाही असं मला वाटतं.असं राजकारण आतापर्यंत झालं नव्हतं."
 
भाजपसारखा पक्ष आमच्या पाठिशी उभा आहे त्यामुळे असं काही आता पुन्हा होईल असं वाटत नाही असंही त्या म्हणाल्या.