बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:19 IST)

मी महाविकास आघाडी सरकारच्या खोटे साक्षीदार उभे करण्याच्या षडयंत्राचा खुलासा करणार : फडणवीस

भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला मोठा इशारा दिलाय. काही दिवसातच मी महाविकास आघाडी सरकारच्या खोटे साक्षीदार उभे करण्याच्या षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मविआचे नेते खोटे साक्षीदारांबाबत आरोप करत आहेत. मात्र, ईडीच्या वकिलांनी या प्रकरणातील तथ्य न्यायालयासमोर ठेवले त्यामुळेच नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंतची कोठडी मिळाली. उलट मीच काही दिवसात महाराष्ट्र सरकार कशाप्रकारे खोटे साक्षीदार करण्याचं षडयंत्र तयार करत आहे त्याचा खुलासा करणार आहे.”
 
मविआ सरकारची यंत्रणा खोटेपणा करून लोकांना, नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातील काही खुलासे मी लवकरच करणार आहे. मात्र, सध्या या प्रकरणावर लक्ष देऊयात,” असं फडणवीस यांनी म्हटलं.