शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (21:45 IST)

बाळासाहेब असते तर,एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता-अभिजीत बिचकुले

Abhijit Bichukale
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेच्या भुमिकेनंतर राज्यात शिवसैनिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान बिगबाॅस फेम अभिजीत बिचकुले यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून एकनाथ शिंदे राजकारण करत आहेत ते योग्य नाही. आता जर बाळासाहेब ठाकरे (असते तर त्यांनी एकनाथ शिंदेच्या  कानाखाली जाळ काढला असता अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचकुले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.आज ते आळंदीला गेले आहेत.
 
 
पुढे बोलताना ते म्हणाले, मी अपक्ष आहे. माझा शिवसेनेचा काही संबंध नाही. पण सध्या जे राजकारण सुरु आहे त्यावरुन सर्वसामान्यांची होरपळ होतेय असे वाटते असेही ते म्हणाले. आज जे सेनेतील मोठे नेते आहेत ते बाळासाहेबांच्यामुळेच मोठे झाले आहेत. यांना अभिजीत बिचुकले वरईमध्ये येवून उभा राहतो याची काॅपी करायची सवय लागली आहे. उध्दव ठाकरे  यांच्यावर राजकारण सुरु आहे असं मला वाटतं पण तो त्यांच्या घरचा मुद्दा आहे याबाबतीत बोलण योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले.