मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (10:26 IST)

एसटी विलिनीकरण शक्य नव्हतं तर जाहीरनाम्यात का उल्लेख केला? - गोपीचंद पडळकर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. पवार कुटुंबावर विश्वास ठेवू नका हे एसटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून सांगत होतो, असं पडळकर म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एसटीचं विलिनीकरण करणं कुणालाही शक्य नसल्याचं वक्तव्य करत याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. यावरूनही पडळकरांनी टीका केली.
विलीनीकरण शक्य नाही हे अजित पवारांना माहिती होतं, तर राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात उल्लेख का केला होता? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
एसटी कर्मचारी ज्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यांनीच आज कर्मचाऱ्यांचा घात केला, असा आरोपही पडळकरांनी पवारांवर केला आहे.