सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (10:53 IST)

हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या - नाना पटोले

"भारतीय जनता पक्षात हिंमत असेल तर त्यांनी केंद्र सरकार बरखास्त करून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात," असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.
 
महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या,' अशी टीका भाजपने केली होती, त्याच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेसनेही त्यांना प्रतिआव्हान दिलं आहे.
 
CBI, ED, आयकर, NCB यांच्यासारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर कारवाई केली. महाराष्ट्राला बदनाम केलं तरी सरकार पडणार नाही. उलट ते भक्कम झालं आहे, असं पटोले म्हणाले.