1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (21:56 IST)

हॉस्पिटलमध्ये आढळले अवैध सोनोग्राफी मशीन

नाशिक  शहरातील नाशिकरोड देवळलीगावात एका हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या सोनोग्राफी मशीन आढळून आले आहे. या घटनेने नाशिकच्या आरोग्य विभागात एकाच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे गर्भनिदान सुरू असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापुसाहेब नागरगोजे यांच्या पथकाने सदर रुग्णालयात छापा टाकला असता या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आढळून आहे.
 
हे रुग्णालय डॉक्टर दाम्पत्याच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालया यातील एक जण अस्थिरोग तज्ञ म्हणून कामकाज पाहत असल्याचीही माहिती आहे. महापालिकेचे डॉक्टर त्यांचा खाजगी हॉस्पिटलमध्ये अवैध रित्या मशीन बाळगतात ही बाब समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या संदर्भात तपास सुरु असून डॉ नारगोजे यांनी माध्यमांशी बोलताना हे मशीन सील करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. शहरातीलच एका हॉस्पिटलच्या नावाने मशीनची नोंद आहे.
 
प्रसूतीपूर्व लिंग निदानासाठी होणा-या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसुतीपूर्व निदानतंत्र (विनीयमन व दुरुपयोगावरील प्रतिबंध) कायदा १९९४ लागू करण्‍यात आला. त्यानुसार लिंग निदान होईल अशा उपकरणांचा व तंत्राचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. अशात हे मशीन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या मशीनवर आत्तापर्यंत किती रुग्णांची तपासणी झाली, कोणकोणत्या तपासण्या झाल्या याचा तपास सुरु असून तपासाअंती दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे डॉक्टर नागरगोजे म्हणाले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor