शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (12:30 IST)

तिळावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवप्रेमींनी आपआपल्या पद्धतीने त्यांना मान वंदना दिली. राज्यात सिंधुदुर्गातील गवाणे येथील एका चित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पांढऱ्या तिळावर साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे. अक्षय मेस्त्री असे या चित्रकाराचे नाव आहे. 
 
शिवजयंती निमित्ताने त्यांनी ही सूक्ष्म कलाकृती बनवली आहे. या पूर्वी देखील त्यांनी अनेक महान व्यक्तींना आपल्या कलाकृतींनी मान वंदना दिल्या आहेत. आपल्या कलेतून विविध संदेश देणारे अक्षय मेस्त्री यांनी शिव जयंती निमित्ते तिळावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. त्यांनी यासाठी तीन महिन्यांपासून सराव केला आहे. त्यांना महाराजांची प्रतिमा साकारण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागला. त्यात अक्षय यांनी भिंगाचा वापर केला असून रंगासाठी अक्रेलिक रंगाचा वापर केला आहे.
 
अक्षय यांनी या पूर्वी भारतरत्न लतामंगेशकर, पदमश्री सिंधुताई सपकाळ, बाळासाहेब ठाकरे, दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण, बाबासाहेब पुरंदरे, भारुडरत्न निरंजन भाकरे, बिपीन रावत, गझलकार मधुसूदन नानिवडेकर या मान्यवरांना आपट्यांच्या पानावर, तुळशीच्या पानावर, वृत्तपत्रावर, सुपारीवर, तिळावर आणि विटांवर चित्र आकारून त्यांना मानवंदना दिली आहे.