कल्याण शालेय 275 पुस्तकांच्या उपयोगातून साकारली सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा
सम्राट अशोक विद्यालयाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पुस्तक रुपाने साकारून सावित्रीबाई फुलेंना आगळ्या वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले. पाली भाषा प्रचार आणि प्रसार संचालित सम्राट अशोक विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 275 शालेय पुस्तकांच्या सहाय्याने 20 बाय 15 फुट लांबी रुंदीची प्रतिमा साकारली. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय तसेच रामदास बोराडे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकर्याने ही प्रतिमा साकारली.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर तसेच गुरुकृपा कॉलेजच्या प्राचार्य विद्युलता कोल्हे या सावित्रीच्या लेकी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी हेमा मुंबरकर यांनी सांगितले की आज या पदावर येण्यासाठीचे सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले यांनाच जाते. तर प्राचार्य विद्युलता कोल्हे यांनी शाळेने साकारलेल्या पुस्तकरूपी प्रतिमेचे तोंडभरून कौतुक केले.