मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑगस्ट 2025 (15:22 IST)

बीडमध्ये ग्लूच्या व्यसनामुळे तरुणाचा आई,वडील आजीवर चाकूने हल्ला, आजीचा मृत्यू

crime
व्यसन कोणतेही असो वाईटच आहे. दारूचा व्यसन, ड्रग्सचा व्यसन सारखाच एखाद्याला ग्लुचे व्यसन असते हे एक प्रकारचे ड्रग्स आहे या मध्ये व्यसनी ग्लू वाळवून त्याला गरम करून त्याची वाफ श्वासात घेते. यामुळे लवकर मेंदूवर परिणाम होतो. जास्तकाळ याच्या आहारी गेल्याने व्यक्तीच्या आरोग्याला आणि मेंदूला नुकसान होतो. 
बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाने ग्लूच्या व्यसनापोटी नशेत आई, वडील आणि आजीवर धारदारचाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आजीचा मृत्यू झाला तर आई वडिलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. झुबेदा कुरेशी असे मयत वुद्धाचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत झुबेदा कुरेशी आपली कुटुंबासह परळी वास्तव्यास होती.तिच्या सह मुलगा, सून आणि नातू असे राहायचे. तिच्या नातवाला ग्लूच्या नशेचे व्यसन लागले. 

रविवारी आरोपी नातू ग्लूच्या नशेत घरी पोहोचला आणि त्याने ग्लू खरेदी करण्यासाठी कुटुंबाकडून पैसे मागितले. पालकांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने स्वयंपाकघरातील चाकू आणून आजीवर हल्ला केला. या हल्ल्यात आजी गंभीर जखमी झाली.
एवढेच नाही तर आरोपीने मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पालकांवरही चाकूने हल्ला केला. आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला कसेबसे ताब्यात घेतले. झुबेदाला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर आरोपीच्या पालकांवर अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Edited By - Priya Dixit