शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (18:28 IST)

परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला

In canceling the exam
“MPSC ची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 
 
“मला जे बोलायचे ते मी बोलतो. मी एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी,” असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला.
 
“मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने  विश्वास दिला नाही. महाविकासआघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशची अंमलबजावणी करत नाही,” अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.