बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (18:02 IST)

नागपुरात तरुणाने आईला तलवारीने धमकावले

crime
मुलांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी आईवडील काहीही करतात.पण हट्ट पूर्ण केले नाही म्हणून एका 18 वर्षीय तरुणाने आईसोबत जे काही केले ते धक्कादायक आहे. 

नागपुरात एका 18 वर्षीय तरुणाने आईकडून नवीन फोन घेण्यासाठी 10 हजार रुपये मागितले आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर मुलाने चक्क आईला तलवारीने धमकावले आहे. 
एका पोलीस अधिकाऱ्याने सदर माहिती दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. महिला कामावरून घरी परतली तेव्हा मुलाने तिच्याकडून फोन विकत घेण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली तेव्हा आईने आर्थिक अडचण असल्याचे सांगत नकार दिला.

नकार मिळाल्यावर त्याने आईसोबत  गैर वर्तन केले त्याने आई आणि  बहिणीला तलवारीचा धाक दाखवत घराची नासधूस केली. नंतर मुलगा घरातून पळून गेला .महिलेने मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाचा शोध सुरू आहे.  
Edited By - Priya Dixit