गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (16:59 IST)

नागपूरमध्ये भाज्या महाग झाल्या, भाज्यांचे दर दुप्पट झाले

नागपुरमध्ये पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. आठ दिवसांत किरकोळ बाजारात भाज्या दुप्पट महाग झाल्या आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार आहे. 
 
पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. शहरातील रामदारसपेठ भाजी बाजारात फुलकोबी 120 रुपये, दोडका 120 रुपये, मेथी 160 रुपये, कोथिंबीर 100 रुपये, टोमॅटो 80 रुपये, तर वांगी 70 ते 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे.  आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार असल्याचं व्यापाऱ्याचं मत आहे.