सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (12:13 IST)

नांदगाव तालुक्यात वीज पडून शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍याचा बळी घेतला आहे. याचबरोबर शेतकर्‍याची बैलजोडीचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव तालुक्याती तळवाडे या गावात ही घटना घडली आहे. काल सायंकाळच्या सुमारास तळवाडे परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरवतात झाली. यावेळी निकम हे बैलजोडीसह शेतात काम करत होते. पाऊस आल्याने त्यांनी घराकडे जायजे ठरवले आणि बैलांना घेऊन घराकडे येत असताना अचानक वीज अंगावर पडून शेतकरी निकम आणि त्यांच्यासोबत बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला आहे.