1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 मे 2025 (18:26 IST)

रायगडमध्ये, प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

death
रायगड जिल्ह्यातील परळी भागात तरुणाने प्रेयसीच्या चरित्रावर संशय घेत तिची हत्या केली नंतर त्याने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली. 
मिळालेल्या माहितीनुसार, परळीच्या एका रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला असणाऱ्या एका तरुणीचे एका तरुणाशी प्रेम संबंध होते. तरुणाला प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यांचे या वरून वाद झाले आणि रागाच्या भरात त्याने तरुणीवर कोयत्याने वार करत तिची हत्या केली. घटनास्थळी तरुणीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. 
या घटनेनन्तर तरुणाने स्वतःला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळल्यावर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit