मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2024 (20:39 IST)

राज्यात कुठे उन्हाचा तडाखा वाढला, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका बसला

राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. सांगसीलह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
 
पुण्यात सलग तिस-या दिवशी पावसाला सुरूवात झालीये...वादळी वा-यासह पाऊस पडत आहे. तर वाघोली परिसरात गारांचा मारा झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. तर दुसरीकडे राज्यभरात उष्णतेची लाट पसरली. सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत आहे. हवामान खात्यानंही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर, पारा चाळीशीच्या पार पोहचला आहे.  तसंच मुंबईमध्येही प्रचंड उष्णता वाढली आहे.
 
सागंलीत वादळी वाऱ्यासह,अवकाळी पाऊस तर काही भागात गारांचा पाऊस
सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाली आहे. तर, काही भागात गारांचा पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकाना दिलासा मिळाला आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस
अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला आहे. अकोले तालुक्यातील राजूर परीसरात पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने नागरिकांची धावपळ उडाली आहे. उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस कोसळ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे  37°C आणि  27°C च्या आसपास असेल. कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहाणार आहे.  प्रतितास 30-40  किमी वेगाने वारे वाहतील. तसेच  हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
मालेगावच्या तापमानाचा पारा 43.2 अंशावर
नाशिकच्या मालेगावमध्ये तापामानात सतत वाढ पाहायला मिळत असून आहे. आग ओकणाऱ्या सूर्यनारायणा मुळे मालेगावच्या तापमानाचा पारा 43.2 अंशावर पोहचला असून हे या वर्षीच्या हंगामातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले.

Edited By - Ratnadeep Ranshoor